भावेश खंडारेचा MHT CET चा प्रवास

नमस्कार, या blog मध्ये आपण भावेश खंडारे याची MHT CET ची तयारी आणि ICT (Institute of Chemical Technology, Mumbai) येथे B. Pharmacy साठी admission घेण्यापर्यंतचा प्रवास पाहणार आहोत. या मधून तुम्हाला MHT CET साठी कशी तयारी करावी हे समजेल व तुम्ही सुद्धा एखाद्या सर्वोत्तम कॉलेज मध्ये admission घ्याल.

Bhavesh Khandare (ICT Mumbai)

भावेश मूळचा नागपूरचा आहे व सध्या ICT (Institute of Chemical Technology, Mumbai) येथे B. Pharmacy चे शिक्षण घेत आहे. दहावी मध्ये त्याला 90% होते तर बारावी मध्ये PCMB group मधून 81% होते. तर MHT CET मध्ये PCB Group मध्ये 98.94 percentile होते. भावेश सांगतो की B. Pharmacy ला admission घेणे असे काही ठरलेले नव्हते पण MHT CET चा application form भरताना PCM group चा form भरणे त्याचाकडून चुकीने राहून गेले. कारण शेवटची तारीख संपलेली त्याच्या लक्षात आले नव्हते. पण PCMB group असल्याने PCB group चा form भरला होता. त्यामूळे त्याने फक्त MHT CET ची PCB ची परीक्षा दिली. या चुकीचा पश्चाताप होतो का असे विचारले असता भावेश सांगतो की, "तसे काही नाही कारण, ICT सारख्या top कॉलेजमधून B. Pharmacy करत आहे तर मी समाधानीच आहे.

Bhavesh Khandare MHT CET Result


गंमत ही आहे की भावेश ला MHT CET विषयी संपूर्ण माहिती बारावी बोर्ड परीक्षा झाल्यानंतर मिळाली होती. MHT CET व इतर परीक्षा science च्या विद्यार्थ्यांसाठी असतात हे त्याला माहीत होते पण संपूर्णपणे माहिती सुरुवातीपासून त्याला नव्हती. म्हणजेच भावेशने MHT CET साठी ची खरे तयारी बारावी बोर्ड परीक्षा संपल्यानंतर केली. पण एवढ्या कमी वेळेत त्याने 98% कसे काढले याचे उत्तर तुम्हाला पुढे भेटेल.

भावेशची अकरावीची सुरुवातच ऑनलाईन एज्युकेशनने झाली होती कारण त्यावेळेस कोरोनामुळे lockdown होते. त्याचे अकरावी ऍडमिशन देखील उशिरा झाले होते त्यामुळे अकरावी चा अभ्यासक्रम फास्ट पुढे ढकला जात होता व लवकरच त्याची बारावीची तयारी देखील सुरू झाली होती. सकाळी आठ ते बारा ऑनलाईन कॉलेज लेक्चर करून दुपारी बारा नंतर तो तीन वाजेपर्यंत क्लासला जायचा. असा त्याचा दिनक्रम होता. आपण यामधून पाहू शकतो की एका फिक्स routine ला तो स्टिक झाला होता. तुम्ही देखील तुमचे फिक्स routine तयार करून शकता.

बारावी बोर्ड परीक्षा झाल्यानंतर लगेचच मे महिन्यामध्ये त्यावर्षी MHT CET ची परीक्षा नव्हती. कोरोनामुळे परीक्षा खूप पुढे ढकलली केली होती. म्हणजेच भावेश जवळ चार-पाच महिन्यांचा वेळ होता पण पहिले जवळजवळ दोन महिने त्याने काही खास अभ्यास केला नाही केला असेल तर थोडाफारच. पण शेवटच्या तीन महिन्यांमध्ये भावेशने पूर्ण समर्पण देऊन अभ्यास केला कशा पद्धतीने ते आपण पुढे पाहुयात.

Biology च्या अभ्यासासाठी काही टिप्स विचारले असता भावेश सांगतो की मी biology चे संपूर्ण पुस्तक अंदाजे दहा ते पंधरा वेळा वाचले होते. सारखे सारखे वाचन करून biology आधीच खूप strong झाले होते. Flow chart, mind maps व स्वतःच्या notes काढून सुद्धा biology चा अभ्यास करायचा. तसेच लवकर न समजणाऱ्या गोष्टी स्वतःच्या भाषेत लिहून मग ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. Physics साठी जास्तीत जास्त numericals सोडवा व practice करा. तसेच सर्व formula लक्षात राहण्यासाठी formula bank बनवा. chemistry साठी देखील जास्तीत जास्त वाचन करा तसेच reaction चे flowchart, mind maps तयार करणे उपयोगी ठरू शकते.


MHT CET मध्ये Time Management खूप महत्त्वाचे आहे भावेशने पहिल्या 90 मिनिटांमध्ये Physics chemistry साठी सारखाच वेळ दिला होता म्हणजेच 45 45 मिनिटे अशा पद्धतीने. सुरुवात chemistry पासून केली होती आणि नंतर physics. पहिले 90 मिनिटानंतर biology सुरू होते पुढील नव्वद मिनिटांमध्ये तो पूर्ण वेळ असल्यामुळे पूर्ण वेळ तिथे देता येतो. MHT CET मध्ये Time Management व्यवस्थित करण्यासाठी जास्तीत जास्त Mock Test देणे उपयोगी ठरेल. पुस्तके MHT CET साठी भावेशने ने Target Publication ची वापरली होती.

ऍडमिशन प्रोसेस मध्ये भावेशला पहिल्या राउंड मध्ये Poona college of Pharmacy लागले होते व दुसऱ्या राउंडला ICT लागले की ज्यामध्ये त्यांनी ऍडमिशन घेतले.

Institute of Chemical Technology (ICT)

आता आपण बोलूया की कमी वेळेत भावेशचा इतका अभ्यास कसा झाला तर भावेशने बोर्ड परीक्षा नंतर MHT CET ची तयारी सुरू केली पण खरे पाहता त्याने पूर्ण अकरावी आणि बारावीचा अभ्यास प्रामाणिकपणे पूर्ण केला होता. त्याच्या Basic concept सर्व clear होत्या. biology चे पुस्तक 10 ते 20 वेळा वाचले असेल यावरूनच त्याचा अभ्यास दिसून येतो. त्याचाच फायदा भावेशला CET साठी झाला. पण भावेश हे देखील सांगतो की फक्त बोर्डे साठीच्या अभ्यास CET साठी पूर्णपणे काम करेल असे नाही. तर तुम्हाला MHT CET Mock test आणि PYQs सुद्धा सोडवावे लागतील. अशाप्रकारे अकरावी आणि बारावीचा प्रामाणिक अभ्यास सीईटीसाठीचा पाया आहे असे भावेश सांगतो.

इथपर्यंत जे वाचत आले आहेत त्यांचे खूप खूप धन्यवाद. Easy Concept wala YouTube channel वर अशाच प्रकारचे interview video playlist मध्ये उपलब्ध आहेत ते देखील तुम्ही पाहू शकता. भावेशला तुमचा काही प्रश्न विचारण्यासाठी त्याला khandarebhavesh342@gmail.com वर संपर्क करू शकता.

पुढील इंटरव्यू ब्लॉग मिळवण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा: Whatsapp Group