MHT CET परीक्षेची माहिती 

 नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपल्या सर्वांचे विद्यार्थी माझा वर स्वागत आहे. या लेखामध्ये आपण MHT CET या परीक्षेमध्ये किती गुण प्राप्त करावे लागतील जेणे करून तुम्ही महाराष्ट्रातील टॉपच्या Engineering कॉलेजेस मध्ये admission घेऊ शकाल या विषयी माहिती पाहणार आहोत. 

MHT CET examination information

MHT CET ही महाराष्ट्र राज्यामध्ये Engineering, Pharmacy आणि Agriculture colleges मध्ये admission घेण्यासाठी घेतली जाणारी state common entrance test परीक्षा आहे. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाामार्फत cet cell च्या माध्यमातून आयोजित केली जाते. ही परीक्षा HSC म्हणजेच बारावी Science मध्ये शिकत असलेला विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी देऊ शकते. साधारणपणे दर वर्षी मे महिन्यामध्ये ही परिक्षा आयोजित केली जाते की ज्यासाठी सुमारे 3-5 लाख विद्यार्थी बसतात. 


MHT CET एकुण 200 गुणांची असते. यामध्ये एकुण 3 विषय असतात. जसे की Physics, chemistry आणि mathematics. MHT CET दोन group मध्ये देता येते. एक PCM ( Physics, chemistry, Mathematics) आणि दुसरा म्हणजे PCB (physics, chemistry आणि biology). PCM group Engineering साठी तर PCB group Pharmacy साठी असतो. जर एखाद्या विद्यार्थ्याला दोन्ही group ची परिक्षा द्याची असेल तर तो देऊ शकतो फकत अट ही आहे की त्याचा group PCMB हा असला पाहिजे. 


गुणांची विभागणी पाहायला गेला तर 

Physics साठी 50 गुण (50 प्रश्न, प्रत्येकी 1 गुण),

Chemistry साठी 50 गुण (50 प्रश्न, प्रत्येकी 1 गुण),

Mathematics / Biology साठी 100 गुण (50 प्रश्न, प्रत्येकी 2 गुण)

अशी विभागणी होते. 


PCM आणि PCB हे दोन्ही paper वेगवेगळे होतात. वेळ यासाठी 180 मिनिटांचा असतो. त्यातील पहिले 90 मिनिटे Physics chemistry साठी असतो. आणि उरलेले 90 मिनिटे Mathematics/ biology साठी असतात. 


MHT CET 2019 पासुन computer based test म्हणजे संगणकावर होत आहे. यासाठी विद्यार्थ्याना त्यांना दिलेल्या परीक्षा केंद्रावर जावे लागते. 


MHT CET परीक्षा देत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना खूप7 खुप शुभेच्छा.