MHT CET Mock Tests

MHT CET परीक्षा शेवटच्या काही दिवसांमध्ये काय करावे याच्यावरती आपण या लेखामध्ये सविस्तर चर्चा करूयात. या कालावधीमध्ये Revision आणि Mock Tests सोडवणे विद्यार्थ्यांच्या हिताचे राहील कारण की आतापर्यंत 11 वी 12 वी जितका अभ्यास केलेला आहे त्याच्या ऍप्लिकेशन करता आलं पाहिजे. Mock Tests सोडवत असताना आपल्याला समजते की आपल्याला MCQ टाइप चे प्रश्न सोडवता येत आहेत का? नाही त्याचप्रमाणे जी वेळेची मर्यादा असते परीक्षेमध्ये त्या वेळेच्या मर्यादेमध्ये राहून ते प्रेशर झेलून आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थितपणे पेपर सोडवता येतोय का? सगळे प्रश्न आपल्याकडून सुटतात का कोणत्या टॉपिक्समध्ये मी weak आहे? कोणते टॉपिक अगदी चुटकी सरशी माझ्याकडून सोडवले जातात? अशा अनेक गोष्टी आपल्याला मॉक टेस्ट मधून लक्षात येतात आणि याच माध्यमातून आपली Revision देखील होत राहते.

mht cet mock tests


    Mock Tests कशा द्यायच्या?

        Mock Test देण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. तुम्ही जर ऑफलाइन कोचिंग क्लाससेस लावले असतील तर तेथे देखील तुम्हाला टेस्ट सिरीज उपलब्ध करून देतच असतील. ऑनलाइन देखील अनेक ठिकाणी Mock Tests दिल्या जात आहेत. आमच्या app वर देखील आम्ही Full length mock test दिल्या आहेत.  Mock Tests किती द्याच्या हा देखील महत्वाचा प्रश्न आहे. कमीत कमी 10 tests तरी देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण असे विद्यार्थी देखील पहिले जे अगदी 50 पेक्षा जास्त टेस्ट देऊन बसलेले असतात. अशा विद्यार्थ्यांचा आधीच सिलेबस पूर्ण झालेला असतो आणि त्यांना revision करण्यासाठी व tests देण्यासाठी खूप वेळ हातात उरतो त्यामुळे ते खूप जास्त mock test देतात. असो आपल्याला किमान 10 mock test द्याच्या आहेत. किमान म्हणत आहे, म्हणजे फक्त 10 असे नाही. 10 पेक्षा ही जास्त तुम्ही या उरलेल्या दिवसांमध्ये tests दिल्या तर ते देखील उत्तमच आहे. पण समजा हा लेख तुम्ही परीक्षेच्या 1-2 महीने वाचत असाल तर प्रयत्न कर की तुम्ही जास्तीत जास्त test द्या. 

    आमच्या App वरील Mock Tests च्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

    Mock Tests कधी द्यायच्या?

        Mock Tests देत असताना आपले बॉडी क्लॉक सेट होईल अशा पद्धतीने द्याव्यात. तुमच्या mht cet च्या परीक्षा वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये असतात आणि 7-8 दिवस चालतात. साधारणपणे सकाळची शिफ्ट ही 9 ते दुपारी 12 या वेळेत होते. तर दुपारची शिफ्ट दुपारी 2 ते संध्याकाळी 5 या वेळेत होते. वेळ थोडी पुढे मागे होऊ शकते पण साधारणपणे याच वेळेत होत असतात परीक्षा. तर तुम्ही याच वेळत जर mock tests सुद्धा दिल्या तर तुमचं शरीर आणि मन त्या वेळेला अनुरूप होईल. तुम्ही सेट व्हाल या वेळेला. दुपारचं झोपू नका कारण तुम्हाला तशी सवय असेल आणि तुमची दुपरचीच शिफ्ट आली तर तुम्हाला कदाचित थोडा प्रॉब्लेम येईल. 

        प्रामाणिक राहणे mock test देताना अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही main जी परीक्षा देत आहात अगदी त्याच पद्धतीने mock test दिली पाहिजे. म्हणजे तुम्ही त्या वेळेस जे अडचणी, मानसिक तनाव या अशा  गोष्टी पाहू शकता आणि त्या कक्ष टाळता येईल या वर उपाय शोधू शकता. 

    हे देखील वाचा: COEP Technological University (COEP Pune)

    Mock Tests Analysis 

        तुम्ही फक्त test दिल्या आणि देतच राहील तर त्याचा काही फायदा होणार नाही. तुम्हाला त्याचे analysis म्हणजेच विश्लेषण देखील करावेच लागेल. कोणत्या टॉपिक चे प्रश्न तुम्हाला सोडवता येत नाही त्या टॉपिक वर फोकस करून,समजून घेऊन त्याच पद्धतीचे आणखी प्रश्न सोडवले पाहिजेत. म्हणजे main exam वेळी देखील त्या topic प्रश्न तुमच्याकडून चुकणार नाहीत. असे तुम्हाला प्रत्येक test ला करायचे आहे. यामूळे तुम्हाला असे अनेक टॉपिक सापडतील जिथे तुम्ही चुकत आहात. असे केल्याने तुम्ही अनेक चुका टाळाल व तेच तर आपल्याला करायचे आहे. Analysis करण्यासाठी तुम्ही तुमचे स्वतःचे method वापरू शकता कारण तुम्हाला माहीत आहे की तुम्ही कुठे चुकत आहेत आणि तुमची learning style काय आहे. पण एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा की तुम्हाला tests दिल्या नंतर त्याचे अनॅलिसिस करायचेच आहे. 

    Mock Tests Score Improvement

        विद्यार्थी जेव्हा पहिल्यांदा mht cet mock test देतो तेव्हा कदाचित त्याचा स्कोर खूपच कमी येऊ शकतो. आशा वेळी अजिबात घाबरायचे नाही कारण ते साहजिक आहे. अनेक विद्यार्थीसोबत असे होत असते अगदी जे topper बनतात ते देखील असे झाल्याचे सांगतात. याच्या वर उपाय काय तर स्कोर improvement करत राहणे. जी mock test दिली आहे त्या मध्ये काय चुका झाल्या ते पहायचे आणि पुढच्या test मध्ये त्या चुका नाही करायच्या. असा loop चालू ठेवायचा. असे केल्याने तुम्ही score सुधारणा करता. लक्षात ठेवा mock test आणि त्याचे analysis या दोन्ही गोष्टी केल्या तरच तुम्ही योग्य गोष्ट केली असे म्हणत येईल. 

        शेवटी मी एवढेच सांगेन की mock test देऊन त्याचे analysis करणे व score improvement करणे तुम्हाला खूप मदत करणार आहे. जारी तुमचं syllabus पूर्ण झाला नसेल तरी mock test देण्याचा प्रयत्न करा. त्यातूनच तुमची revision देखील होईल व परीक्षेत फायदा देखील होईल. अशाच प्रकारच्या mht cet guidance साठी आमचा whatsapp group जॉइन करा.