MHT CET परीक्षेसाठी admit card release करण्यात आले आहे. आता फक्त PCM ग्रुप साठीच ते उपलब्ध आहे परंतु लवकरच PCB ग्रुप साठी देखील उपलब्ध होईल. MHT CET परीक्षा ही महाराष्ट्रातील engineering, pharmacy तसेच agriculture अभ्यासक्रमासाठी घेतली जाणारी प्रवेश परिक्षा म्हणजेच Enterance test आहे. गेली अनेक वर्ष महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा या परीक्षेकडे मोठा कल होता परंतू गेल्या काही वर्षांपासून अनेक इतर राज्यांमधील विद्यार्थी या परिक्षेसाठी बसत असल्याचे दिसून येत आहे. 2023 या वर्षातील परिक्षा ही 9 मे पासून सुरू होत आहे. त्यासाठीच सर्वप्रथम PCM group चे admit card release झाले आहे. या लेखामध्ये आपण पाहुयात की हे admit card कसे पाहायचे व ते कसे download करायचे. तसेच याच admit card वरील आपल्या सेंटर चा पत्ता कसा शोधायचा ते देखील पाहुयात.
Admit कसे download करायचे?
1.सर्वप्रथम MHT CET 2023 च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
2.त्यानंतर तुम्हाला important links या section मध्ये "Download Admit Card for PCM group" असे दिसेल त्यावर क्लिक करा.हे देखील वाचा: 150 प्रश्न आणि 180 मिनिटे - MHT CET
Admit card नीट तपासा
Admit card download केल्यानंतर त्या admit card वरील सर्व माहिती तपासून पहा. जसे की तुमचे संपूर्ण नाव, आईचे नाव, roll number, application number इत्यादी. काहीही चूक त्या admit card मध्ये असल्यास लगेच cet cell च्या helpline number वर call करून त्यांना या विषयी माहिती द्या व काय करावे लागेल ते विचारा.
MHT CET Admit card वरील center चा address शोधा.
MHT CET परीक्षा 2019 पासुन CBT म्हणजेच computer based test अशा पद्धतीने होत आहे त्यामूळे या परीक्षेचे जे exam center असतात ते मोठे मोठे computer exam halls तरी असतात किंवा एखाद्या कॉलेज देखील असू शकते. त्यामूळे हे सेंटर वेळेत शोधुन काढणे देखील गरजेचे आहे. आता पुढे जी युक्ती सांगत आहोत त्या टिप्स सर्वसाधारण किंवा कॉमन सेन्स च्या वाटतीलही पण अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला तयारीत राहण्यास मदत करतात.
1.सर्वप्रथम admit card वर दिलेला exam center चा पत्ता कॉपी करा आणि तो maps मध्ये जाऊन search box मध्ये paste करा. असे search केल्यानंतर 99% chances आहेत की तुम्हाला तुमचे सेंटर maps वर लगेच दिसले. तिथपर्यंत कसे पोहचायचे याचे direction देखील तुम्ही पहा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा जरी maps वर दाखवत असले तरी इतर काही माध्यमातून center नेमके कोणते ठिकाणी आहे याची खातरजमा करा.
तुमचे सेंटर जर बाहेरच्या जिल्ह्यामध्ये आलेले असेल तर आधीच्या दिवशी तिथे जावे लागणार आहे आहे का ते पहा.
अशाप्रकारे तुम्ही तुमच्या MHT CET परीक्षेचे exam center शोधू शकता व वर दिलेल्या काही टिप्स लक्षात घेऊन अगदीं तयरीमध्ये राहू शकता. कारण अभ्यास करण्यासोबतच या अशा गोष्टी देखील लक्षात घेणं व परीक्षेच्या मुख्य दिवशी exam center वर वेळेत पोहचणे देखील गरजेचे आहे. अशाच प्रकारच्या MHT CET guidance साठी आमचा WhatsApp group join करू शकता.


0 Comments